स्पर्शावर आधारित पाणी शुद्धीकरण क्षेत्रातील प्रवर्तक आणि आघाडीच्या लिव्हप्युअर या कंपनीने हवा व पाणी शुद्ध ठेवणा-या उपकरणांची श्रेणी आणखी बळकट करत शुद्धता पुरवण्याचे आपले आश्वासन आणखी बळकट केले आहे. शुद्धता, आरोग्य आणि स्वास्थ्याच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या लिव्हप्युअरने स्मार्ट अॅपने युक्त एयर प्युरीफायर आणि स्मार्ट टच वॉटर प्युरीफायरची नवीन श्रेणी सादर केली. यावेळी कंपनीचे ब्रँड एम्बेसेडर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिव्हप्युअरचे अध्यक्ष श्री नवनीत कपूर उपस्थित होते.
लिव्हप्युअरने सादर केली स्मार्ट एअर आणि वॉटर प्युरीफायरची नवी श्रेणी
मुंबई, ४ डिसेंबर २०१५: स्पर्शावर आधारित पाणी शुद्धीकरण क्षेत्रातील प्रवर्तक आणि आघाडीच्या लिव्हप्युअर या कंपनीने हवा व पाणी शुद्ध ठेवणा-या उपकरणांची श्रेणी आणखी बळकट करत शुद्धता पुरवण्याचे आपले आश्वासन आणखी बळकट केले आहे. शुद्धता, आरोग्य आणि स्वास्थ्याच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या लिव्हप्युअरने स्मार्ट अॅपने युक्त एयर प्युरीफायर आणि स्मार्ट टच वॉटर प्युरीफायरची नवीन श्रेणी सादर केली. यावेळी कंपनीचे ब्रँड एम्बेसेडर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिव्हप्युअरचे अध्यक्ष श्री नवनीत कपूर उपस्थित होते.
या नवीन श्रेणीबाबत बोलताना लिव्हप्युअरचे अध्यक्ष श्री नवनीत कपूर म्हणाले, ''ग्राहकांच्या आयुष्यात शुद्धता आणण्याच्या आमच्या प्रवासात आम्ही पहिल्या घटकाच्या पुढे जात शुद्ध पाण्याबरोबर प्रत्येक श्वासासाठी शुद्ध हवा देणार आहोत, आपले कुटुंब १२ तास किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ बंदिस्त जागेत (घरात) असते. घरातील हवा ही बाहेरच्या हवेपेक्षा दहापटींनी जास्त प्रदुषित असते आणि त्यामुळे विविध प्रकारच्या एलर्जी, अस्थमा, श्वसनाचे विकार तसेच आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. चांगल्या दर्जाच्या अंतर्गत हवेमुळे सरासरी मानवी आयुष्य हे पाच वर्षांपर्यंत वाढवता येते. आम्हाला भारतातील पहिला वाय-फाय अनेबल्ड स्मार्ट एअर प्युरीफायर सादर करताना आनंद होत आहे, जो सर्वांसाठी शुद्धता व स्वास्थ्य आणेल.''
लिव्हप्युअर स्मार्ट एअर प्युरीफायर हा आज उपलब्ध असलेल्या सर्वात कल्पक उत्पादनांपैकी एक असून त्यात अभिरूची व कार्यक्षमता यांचा मेळ घालण्यात आला आहे. हे उपकरण कोणत्याही स्मार्टफोनच्या मदतीने नियंत्रित करता येणार आहे. अतिशय हुशारीने तयार करण्यात आलेल्या या उपकरणात ३६० अंश इनलेट डिझाइन, तीन स्तरांचे एक्स्ट्रा लार्ज फिल्टर, प्रदुषण, धूळ आणि धूर ९९.९ टक्क्यांपर्यंत काढून टाकण्याची क्षमता असलेले अपोलो एच११ हेपा फिल्टर बसवण्यात आले आहे. त्यामध्ये ग्राहकासाठी उपयुक्त असे चाइल्ड स्लीप मोड, इंटेलिजंट मोड, वीकेंड मोड आणि रिझर्व्हेशन मोड देण्यात आले असून त्यामुळे उत्पादाच्या स्मार्टपणात भर पडते.
भारतातील पहिला वाय-फाय एनेबल्ड एअर प्युरीफायर सादर करताना भारतरत्न, लिजेंडरी आणि लिव्हप्युअरशी गेल्या चार वर्षांपासून जोडले गेलेले सचिन तेंडुलकर म्हणाले, ''लिव्हप्युअरने एक पाऊल पुढे जात स्मार्ट आणि कल्पक एअर प्युरीफायर्सची नवी श्रेणी रत्न केल्याचा मला आनंद वाटतो. अब पानी के साथ हवा भी शुद्ध, कम ऑन इंडिया लिव्हप्युअर.''
लिव्हप्युअरच्या एअर प्युरीफायर्सची श्रेणी भारतातील आघाडीची ऑनलाइन बाजारपेठ – फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment