भारतामध्ये प्रथमच शेअरबाजाराचे पूर्वानुमान करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित
पैसा ही जीवनातील सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे. तो मिळवण्यासाठी माणूस सर्वोतोपरी प्रयत्न करतो. त्यासाठी तो बऱ्याचठिकाणी जसे शेअरमार्केट, म्युचुअल फंड, IPO अशा ठिकाणी गुंतवणूक करतो. त्याला यश येते तर कधी अपयश येते. पण पुढच्याकाळात शेअर चा भाव किती वाढेल? स्टॉकमार्केट ची काय स्थिती असेल? डॉलर चा भाव काय असेल. हे सर्व आजच आपल्यालाकळले तर? याच विषयावर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अँस्ट्रोलॉजर्स सोसायटी (AIFAS)तर्फे भारतात पहिल्यांदाच मुंबईतील सहारास्टार हॉटेल मध्ये अँस्ट्रोलॉजिकल कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्याहस्ते झाले. तसेच पैसा आणि शेअर मार्केट व ऋतू यांची माहिती देणाऱ्या नवीन सॉफ्टवेअर विकसित केल्याची घोषणा करण्यातआली. या प्रसंगी त्यांच्याबरोबर AIFAS चे उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक जयंत पांडे, प्रसिद्ध ज्योतिष विशारद अजयभामजी, पंडित जयप्रकाश शर्मा लाल धागेवाले, श्री अरुण बन्सल, श्रीमती शिबानी कसुल्ला, प्रसिद्ध उद्योगपती माधव गोपाल व इतरमान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला जवळपास देशभरातून ४०० ज्योतिषी उपस्थित होते. तसेच जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली
या कार्यक्रमाचे आयोजक जयंत पांडे म्हणाले की ज्योतिष हे सांगायला गेले तर नवग्रहांचा खेळ आहे. पण हे नवग्रहांचा प्रभावकसा पडतो हे आपण पाहू शकत नाही. यांचा प्रभाव सूक्ष्म असतो. प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक गोष्टीवर यांचा प्रभाव असतो.अँस्ट्रोलॉजीच्या मदतीने आपण ग्रहांची चाल आणि त्यांचा प्रभाव यांची गणना करू शकतो. त्याच आधारे उद्या स्टॉकमार्केटमध्येहोणाऱ्या चढ उतराबद्दल आज अनुमान लावता येऊ शकेल. तसेच उद्या शेअरचा भाव काय असेल, जागतिक बाजारात रुपयाची कितीकिंमत असेल याचे सुद्धा आज भाकीत करता येऊ शकते आणि याची विश्वासार्हता ८०% असते. ८०% भाकिते खरी ठरतात.
या अँस्ट्रोलॉजीकल कॉनक्लेव्ह चे उद्घाटक राज कुंद्रा म्हणाले की जेव्हा माणसाची चांगले दिवस असतात तेव्हा तोज्योतिषाकडे जात नाही. वाईट दिवस असतात तेव्हाच सर्व ज्योतिषाकडे जातात. अँस्ट्रोलॉजी चे जसे सॉफ्टवेअर बनवले गेले तसेचIPL चे ही बनावे अशी माझी इच्छा आहे.
No comments:
Post a Comment