Monday, 18 January 2016

बार्डो चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

उत्तम चित्रपट निर्मितीच्या ध्यासाने पछाडलेली तरुणाई वेगवेगळ्या वाटा धुंडाळू लागली आहे. यातूनच नाविन्यपूर्ण विषयावरचे सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीत दिसू लागले आहेत. रितू फिल्म्स कट प्रोडक्शन वपांचजन्य प्रोडक्शन प्रा.लि चा बार्डो हा असाच वेगळ्या विषयावरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गीतध्वनीमुद्रणाने या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. जीवनमूल्यांचा वेध घेणाऱ्या बार्डो या सिनेमाचं दिग्दर्शन भिमराव मुडे करीत आहेत. ‘बांध रेआशेची शिदोरी.. तोड रेभीतीची तिजोरी’ असे सकारात्मक बोल असलेल्या गीताने बार्डोचा मुहूर्त झाला असून हाच दृष्टीकोन बार्डो चित्रपट प्रेक्षकांना देईल, अशी आशा दिग्दर्शक भिमराव मुडे यांनी व्यक्त केली.
जीवनाच्या प्रवासात इच्छितस्थळी पोहचेपर्यंत मधल्या प्रवासाची जी गंमत असते ती गंमत म्हणजेच..बार्डो हा चित्रपट, असं सांगत हा चित्रपट प्रेक्षकांना कलात्मक आनंद देईल असा विश्वास अभिनेते मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला. दिग्दर्शकाने केलेला हा वेगळा प्रयोग दाद देण्यासारखा असून एक आव्हानात्मक व वेगळी भूमिका मला साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेते अशोक समर्थ यांनी बोलून दाखवला.
चित्रपटाच लेखन भिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांनी केलं आहे. मनोज यादवगणेश चंदनशिवे यांच्या गीतांना संगीतकार रोहन-रोहन यांचा संगीतसाज लाभला आहे. चित्रपटाचे छायांकन विनायक जाधव यांचे असून कलादिग्दर्शन तृप्ती ताम्हाणे याचं आहे. वेशभूषा महेश शेरला व रंगभूषा निलेश सोनावणे यांनी सांभाळली आहे. चंद्रशेखर नन्नावरे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
ऋतुजा गायकवाड-बजाज व अनिल गायकवाड निर्मित या चित्रपटात मकरंद देशपांडेअशोक समर्थअंजली पाटीलगौतम जोगळेकरगिरीश परदेशीसंदेश जाधव,  प्रणव रावराणे, श्वेता पेंडसे,  रुपेश बनेसुयश शिर्के,वर्षा दांदळे जगन्नाथ निवंगुणेरमेश वाणीपूर्णिमा अहिरेअतुल महाजनअगस्त्य मुडे,  भूमी प्रधान यांच्या भूमिका आहेत. बार्डोच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

No comments:

Post a Comment