Thursday, 24 December 2015

४ व्या ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल'च्या उद्‌घाटन सोहळ्यात अभिनय क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल अभिनेत्री वहिदा रेहमान सन्मानित


          कलाकार हा कलागुणांमुळे नावाजला जातोच पण त्याच्या यशात त्याला सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांची साथ ही तितकीच महत्त्वपूर्ण असते. मला मिळालेला पुरस्कार हा मी माझ्या सहकाऱ्यांना समर्पित करते असं सांगत ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.आशियातील निवडक चित्रपट आणि लघुपटांचा खजिना असलेल्या १४ व्या ‘थर्ड आयआशियाई चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
          'थर्ड आयआशियाई चित्रपट महोत्सवालाआज प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीत थाटामाटात आरंभ झाला.राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या महोत्सवाचे उद्‌घाटन केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांतारामसंचालक सुधीर नांदगांवकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनय क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनाज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्तेशाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सौंदर्य आणि अभिनयाचा अभूतपूर्व मिलाफ असलेली हीअभिनेत्री भारतीय सिनेसृष्टीचा खरा गौरव आहे असे गौरवोद्गार श्याम बेनेगल यांनी यावेळी काढले. मिलिंद चंपानरेकर अनुवादित ‘वहिदा रेहमान हितगुजातून उलगडलेली’या पुस्तकाचे प्रकाशन ही यावेळी झाले.
          यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन सुधीर नांदगांवकर यांनी केले. तर या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे मत मा. किरण शांताराम यांनी व्यक्त केले.हा महोत्सव मुंबई प्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर शहरातही व्हायला हवा अशी अपेक्षाराज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी बोलून दाखवली.
          महोत्सवाचे उद्घाटन प्रियामानसम’ या विनोद मंकारा दिग्दर्शित संस्कृत सिनेमाने झाले. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यानअनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.

No comments:

Post a Comment