Monday, 28 December 2015

मानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेत भाव(अ)पूर्ण श्रद्धांजलीप्रथम




एकांकिका स्पर्धेत आपलं वेगळेपण दाखवून देणाऱ्या मानाचि आयोजित उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेतभाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ (कलासाधना मुंबई) एकांकिका प्रथम तर ‘बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’(इम्प्रोव्हायझेशन मुंबई) ही एकांकिका व्दितीय क्रमांकाने विजयी ठरली. भाव(अ)पूर्ण श्रद्धांजलीएकांकिकेसाठी स्वप्नील पाथरे यांना  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व लेखकाचा पुरस्कार मिळाला.
यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे झालेल्या अंतिम फेरीत सात एकांकिका सादर झाल्या. अंतिम फेरीसाठी गणेश पंडित, वामन तावडे, संभाजी सावंत, राजीव जोशी, सुरेश जयराम, भालचंद्र झा, डॉ अनिल बांदिवडेकर, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मान्यवरांनी सुचविलेल्या विषयावरच्या एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या.
मानाचि आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचं’ हे पहिलंच वर्ष असून स्पर्धेला मिळालेला दमदार प्रतिसाद व सादर झालेल्या एकांकिका या अभिरुचीपूर्ण असल्याने कलाकर्मीनी व प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला.
विजेत्यांची नावे खालील प्रमाणे -
सर्वोत्कृष्ट एकांकिका   
प्रथम - ‘भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ (कलासाधना मुंबई)
व्दितीय - बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’ (इम्प्रोव्हायझेशन मुंबई)
तृतीय - १० पैकी  (ऑन स्टेज मुंबई)
उतेजनार्थ -  जुनं ते सोनं (अनामय मुंबई)
प्रेक्षक पसंती एकांकिका - भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ (कलासाधना मुंबई)
सर्वोत्कृष्ट लेखक 
प्रथम- स्वनील पाथरे (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)
व्दितीय - विशाल कदम  (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)
तृतीय - सरिता आगरकर (स्वीट कोर्न)
विनोदी लेखक - देवेंद्र पेम (जुनं ते सोनं)
सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक

प्रथम- स्वनील पाथरे (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)
व्दितीय - विनोद जाधव (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)
तृतीय - विनोद गायकर (१० पैकी) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता
प्रथम - अजिंक्य दाते ( १० पैकी)
व्दितीय - सुजित यादव. (बजा के तो देख)
तृतीय - गौरव मालणकर... (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)
विनोदी अभिनेता – विनोद जाधव (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब) 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
प्रथम-  सुमेक्षा जाधव (बजा के तो देख)
व्दितीय - शिल्पा साने (स्वीट कोर्न)
तृतीय - प्रियंका हांडे  (देता का डाटा?)
विनोदी अभिनेत्री – मेधा मटकर पाथरे (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली) 
अभिनय प्रशस्तीपत्र
ऐश्वर्या पाटील (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)
सणीभूषण मुणगेकर (जुनं ते सोनं)
मनमीत पेम (जुनं ते सोनं)
अतुल सणस- (१० पैकी)
संदीप रेडकर -(बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)
नेपथ्य - सचिन गोताड (१० पैकी)
प्रकाशयोजना - सुनील देवळेकर (बजा के तो देख)
संगीत -  अमोल सणकुळकर- (स्वीट कोर्न’)
सर्वोत्कृष्ट शीर्षक - (स्वीट कोर्न’)
सर्वोत्कृष्ट अनाऊन्समेंट – (जुनं ते सोनं)

No comments:

Post a Comment