एशियन फिल्म फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाला गुरुवार २४ डिसेंबरपासूनप्रारंभ होत असूनउद्घाटन समारंभात हिंदी चित्रपटसृष्टीतील वैशिष्टय़पूर्ण योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा विशेष पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना गौरविण्यात येणार आहे.
१४ व्या ‘थर्ड आय’ महोत्सवाचे उद्घाटन प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये २४ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते केले जाणार असून वहिदा रहमान यांना ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
अन्य पुरस्कारांमध्ये‘अस्तु’ चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे कार्यकर्ते दिलीप बापट यांना फिल्म सोसायटी चळवळीतील योगदानाबद्दल प्रदान केला जाणार आहे. २४ ते ३१डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवात विविध चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घ्यायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment