अनेक वेगळ्या विषयावरच्या सिनेमांची मराठीत निर्मिती होत आहे.‘सून असावी अशी’ या आगामी मराठी चित्रपटातही एक वेगळा कथाविषय पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील पाच गीतांच्या ध्वनीमुद्रणाने या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.
प्रवीण दवणे यांनी चार गीते लिहिली असून एक गीत रूपा कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. या गीतांना सुरेश वाडकर, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, वैशाली माडे, रोहित राऊत या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. नंदू होनप यांच्या संगीतसाथीने ह्या गीतांचे सूर चांगले जमले आहेत. ही पाचही गीतेवेगवेगळ्या जॉनरची आहेत. ‘मला तगडा चार्जर हवा’ हे आयटम सॉंग, ‘अरे लाखातून मी रूप देखणी’ हा भांगडा तसेच‘धक धक दोन मनांची’ ,‘मन जडलं तुझ्यावर’ व ‘एका गाली हासू आणि आसू दुसऱ्या डोळी’ या भावस्पर्शी गीतांचा यात समावेश आहे
इन्स्पायर प्रॅाडक्शन प्रस्तुत वैशाली कोढे निर्मित ‘सून असावी अशी’ या सिनेमाचे दिग्दर्शन शाम धर्माधिकारी करणार आहेत. ही गीते प्रत्येकालाच आवडतील असा विश्वास दिग्दर्शकशाम धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. या चित्रपटाची कथामनीष कुळकर्णी यांची असून पटकथाशाम धर्माधिकारी यांची आहे. छायाचित्रणाची जबाबदारी मनिष व्यास यांनी सांभाळली आहे. कलाकारांची निवड प्रक्रियासध्या सुरु असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
No comments:
Post a Comment